Iran Israel War – अमेरिकेच्या एअरस्ट्राइकनंतर इराण संतापला; आता ठोस कारवाई करा! सैन्याला दिला फ्री हॅन्ड

Iran Israel War –  अमेरिकेच्या एअरस्ट्राइकनंतर इराण संतापला; आता ठोस कारवाई करा! सैन्याला दिला फ्री हॅन्ड

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जी केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अमेरिकेला उघडपणे धमकी दिली आहे. या बैठकीत इराणने आता सैन्याला फ्री हॅन्ड दिलेला असून, आता सर्व काही सैन्य ठरवेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी सांगितले होते की, ते इराणवर हल्ला करायचा की नाही याचा विचार करतील, परंतु नंतर अचानक अमेरिकेने हल्ला केला.

Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले

अलजझीराच्या वृत्तानुसार इराण म्हणाला, “अमेरिकन आणि इस्रायलच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणचा पूर्ण अधिकार आहे. इराणच्या प्रत्युत्तराची वेळ आता सशस्त्र दल ठरवतील.” इराणचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील राजदूत अमीर सईद इरावनी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत सांगितले की, “अमेरिकेने इराणच्या तिन्ही अणुस्थळांवर हल्ला करून स्वतःला युद्धात सहभागी केले आहे.” इरावनीने अमेरिकेवर बनावट आणि हास्यास्पद सबबी देऊन इराणविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेने इराणी अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला होता की, या कृतीमुळे विनाशकारी दलदल निर्माण होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, “इराणी अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे आता अधिकच धोका निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे हा भाग आधीच खूप मोठ्या संकटांशी सामना करत आहे.”

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही अमेरिकेला इशारा दिला. अराघची म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्रांच्या घोषणापत्राचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि अणुप्रसार अप्रसार कराराचे (एनपीटी) गंभीर उल्लंघन केले आहे.

13 जूनपासून सुरू झालेल्या या इस्रायली हल्ल्यात दोन्ही बाजूंनी मृतांची संख्या 1000 च्या आसपास पोहोचली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 950 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 3450 जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;