जम्मू आणि कश्मीर हा हिदुस्थानचा अंतर्गत मुद्दा, परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीवर साधला निशाणा

जम्मू आणि कश्मीर हा हिदुस्थानचा अंतर्गत मुद्दा, परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीवर साधला निशाणा

जम्मू-कश्मीरबाबत जागतिक पातळीवर खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा हिंदुस्थानने पुन्हा एकदा फाडला आहे. जम्मू-कश्मीरबाबत हिंदुस्थानची भूमिका ठाम असून पाकिस्तानकडून पसरवली जाणारी खोटी माहिती तसेच निरर्थक विधानांना हिंदुस्थान चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा देतानाच हिंदुस्थानने पाकिस्तानवर दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला आहे. याचवेळी हिंदुस्थानने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन(ओआयसी)ला वस्तुस्थिती लक्षात घेण्याचे तसेच आपला मंच कुठल्याही एका देशासाठी राजकीय कटकारस्थानातील हत्यार बनू देऊ नये, असे आवाहन केले आहे.

जम्मू कश्मीर हा हिंदुस्थानचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग आहे असा दावा करीत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या विधानांचे जोरदार खंडन केले आहे. ओआयसीच्या मंत्रिमंडळ परिषद बैठकीदरम्यान पाकिस्तानने केलेल्या अनावश्यक आणि पूर्णपणे चुकीच्या विधानांचे हिंदुस्थानने खंडन केले आहे. पाकिस्तान आपल्या राजकीय स्वार्थासाठी ओआयसी मंचाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाबाबत ओआयसी मूग गिळून गप्प असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. अलिकडेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद हल्ल्याचा संदर्भ देत परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीवर निशाणा साधला.

ओआयसीला जम्मू कश्मीरबरोबरच हिंदुस्थानच्या कुठल्याही अंतर्गत विषयांवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. दहशतवादविरोधातील लढ्यासंदर्भात जागतिक पातळीवर सर्व संमतीने ठरवलेल्या धोरणांचे ओआयसीकडून जाणूनबुझून उल्लंघन केले जात आहे, असा आरोपही हिंदुस्थानने केला आहे. ओआयसीने आपली विश्वासाहर्ता गमावली असल्याची टीकाही हिंदुस्थानने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;