बहिणींची कमाल, एक लाख रुपयांच्या बचतीतून उभारला पाच कोटींचा बिझनेस

बहिणींची कमाल, एक लाख रुपयांच्या बचतीतून उभारला पाच कोटींचा बिझनेस

अनुजा गुप्ता आणि प्रत्यंक्षा गुप्ता या दोन बहिणींनी ‘चौखट’ नावाचा ऑनलाईन फॅशन ब्रँड उभारला. देशी हस्तकौशल्याला विशेषतः चिकनकारीला प्रोत्साहन देणारा हा ब्रँड आहे. दोघींनी पै-पै साठवून एक लाख रुपये जमा केले. त्या जमापुंजीतून उभारलेल्या व्यवसायाने आज पाच कोटींचा पल्ला गाठला आहे.

अनुजा गुप्ता आणि प्रत्यंक्षा गुप्ता या गाझियाबादच्या बहिणी. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी लखनऊमधून चिकनकारीचे सुंदर कुर्ते आणून लोकांपर्यंत पोहोचवले. त्या वेळी प्रत्यंक्षा 23 वर्षांची, तर अनुजा 25 वर्षांची होती. आज ‘चौखट’ एक यशस्वी कंपनी बनली आहे. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर काहीही शक्य आहे.

अनुजा व प्रत्यंक्षाने फेब्रुवारी 2020 मध्ये ‘चौखट’ची सुरुवात इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून केली. दोन्ही बहिणींनी गाझियाबादच्या वैशाली येथील 750 चौरस फुटांच्या घरातून काम सुरू केले. अनुजाला डिजिटल माक्रेटिंगचा अनुभव होता, ज्यामुळे ‘चौखट’ला वाढण्यास मदत झाली. त्यांनी जवळपास 40 कपड्यांपासून सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात त्यांना 34 ऑर्डर मिळाल्या.

अशी सुचली कल्पना

कॉलेजमध्ये असताना प्रत्यंक्षाच्या मनात ‘चौखट’चा विचार आला. 2018 मध्ये ती एका क्राफ्ट डॉक्युमेंटेशन प्रोजेक्टवर काम करत होती. लखनऊच्या चिकनकारीने तिला आकर्षित केले. तिने अनुजाला सोबत घेतले. दोन्ही बहिणींनी मार्केट रिसर्च केला. त्यांना समजले की, स्वस्त चिकनकारी ब्रँडची कमतरता आहे. त्यांना असेही आढळले की, अस्सल चिकनकारी बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. त्यामुळे त्यांना ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आत्मविश्वास मिळाला. ‘चौखट’चा जन्म चिकनकारी बाजार बदलण्यासाठी झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;