Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली

Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली

इराणने सोमवारी प्रत्युत्तर देत कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचा हल्ला इतका जोरदार होता की, कतारची राजधानी दोहामध्येही या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे झालेल्या स्फोटांचा आवाज ऐकू आला.  इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तासांआधीच कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. कारण इराणने अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कतारमध्ये अल उदेद हवाई तळ आहे, जो अमेरिकन लष्कराचा एक प्रमुख तळ आहे. यावर इराणने हल्ला केला आहे. दरम्यान, कतारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत ,ताहिती देताना सांगितले की, या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन सैनिकांना इजा झाली नाही. तसेच, अल उदेद तळावरील अमेरिकन विमाने हल्ल्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;