Chardham Yatra Incident – उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर भूस्खलन, 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Chardham Yatra Incident – उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर भूस्खलन, 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

उत्तरकाशीत यमुनोत्री पायी मार्गावर सोमवारी भूस्खलन झाल्याची घटना घडली. येथील नौ कांचीजवळ टेकडी कोसळली. दुर्घटनेत 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ पथक आणि पोलीस घटनास्थळी दखल झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शार्दुल सिंह गुसाई यांनी घटनेची पुष्टी केली आहे. भूस्खलनामुळे दोन ते तीन लोक गाडले गेल्याची माहिती गुसाई यांनी दिली. माहिती मिळताच जानकी चट्टी आणि इतर ठिकाणांहून मदत आणि बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत, असे गुसाई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;