Raigad News – नागोठणेजवळ डोहात पोहताना दोन भावांसह तीन मुलं बुडाली, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू

Raigad News – नागोठणेजवळ डोहात पोहताना दोन भावांसह तीन मुलं बुडाली, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात नागोठणेजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. बेणसे गावाजवळील सिद्धार्थ नगर परिसरात पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. अश्फाक अन्सारी (16), मिझान जाकीर अत्तर (14) आणि जोहेब जाकीर अत्तर (17) अशी मयत मुलांची नावे आहेत.

तिन्ही मुलं एकाच मोहल्यातील रहिवासी आहेत. यापैकी जोहेब आणि मिझान हे सख्खे भाऊ आहेत. तिघेही शुक्रवारी डोहात पोहायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही पाण्यातून बाहेर काढत नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिघांनाही वडखळ येथील जेएसडब्लू कंपनीच्या संजीवनी रुग्णालयातात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान उपचारादरम्यान शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बेणसे गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;