IND Vs ENG 1st Test – कर्णधार बाद झाला अन् Team India ची गाडी रुळावरुन घसरली; पहिला डाव 471 धावांवर आटोपला

IND Vs ENG 1st Test – कर्णधार बाद झाला अन् Team India ची गाडी रुळावरुन घसरली; पहिला डाव 471 धावांवर आटोपला

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडीबाद 471 धावा केल्या आहेत. यशस्वी जैसवाल (101), केएल राहुल (42), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

टीम इंडियाच्या 430 धावसंख्येवर चार विकेट गेल्या होत्या. त्यामुळे टीम इंडिया 500 चा आकडा सहज पार करेल, असं सर्वांनाच वाटलं होतं. शुभमन गिल बाद झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली आणि पुढील फक्त 31 धावांमध्ये टीम इंडियाचे फलंदाज एकामागोमाग एक तंबुत परतले. पहिलाच सामना खेळणाऱ्या साई सुदर्शन आणि आठ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुण नायरकडून संघासह चाहत्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा होती. परंतु दोघेही शुन्यावर बाद झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावर टिकून राहता आले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतल्या. तर ब्रायडन कार्से आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;