त्यांची इच्छा असेल तर ते आमच्याकडे येऊ शकतात; ट्रम्प- मस्क वादात उडी घेत रशियाची मस्क यांना बंपर ऑफर

त्यांची इच्छा असेल तर ते आमच्याकडे येऊ शकतात; ट्रम्प- मस्क वादात उडी घेत रशियाची मस्क यांना बंपर ऑफर

अमेरिकेतील एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव शिगेला पोहचला असून आता त्यांच्यात राजकीय संघर्षही सुरू झाला आहे. अमेरिकेतील ट्रम्प आणि मस्क यांच्या वादात उडी घेत रशियाने मस्क यांना बंपर ऑफर दिली आहे. या दोघांमधील वादाचा फायदा उचलण्याची संधी रशियाने साधली आहे. एका ज्येष्ठ रशियन खासदाराने मस्कला रशियामध्ये राजकीय आश्रय देण्याची जबरदस्त ऑफर दिली आहे.

रशियन संसदेच्या (ड्यूमा) आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोव्हिकोव्ह यांनी रशियाच्या राज्य वृत्तसंस्थेला सांगितले की, मस्क यांची इच्छा असेल तर रशिया त्यांना आश्रय देण्याचा विचार करू शकतो. नोविकोव्ह म्हणाले, मस्क यांची धोरणे वेगळी आहे, त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची आवश्यकता नाही. मात्र, त्यांना गरज पडली तर रशिया त्यांना निश्चितच आश्रय देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ही अमेरिकेची अंतर्गत बाब आहे आणि आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प- मस्का वाद चिघळत असताना आणि अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असताना रशियाने मस्क यांना ही ऑफर दिली आहे. ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी मस्क यांना अवैध स्थलांतरित म्हटले आहे. तसेच त्यांच्या हकालपट्टी करून स्पेसएक्स जप्त करण्याची मागणी केली आहे. मस्क यांनी त्यांचे ड्रॅगन अंतराळयान बंद करण्याची धमकी दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;