IND Vs ENG 1st Test – 8 वर्षांनी कमबॅक केलं अन् मैदानात उतरताच चाहत्यांचा हिरमोड

IND Vs ENG 1st Test – 8 वर्षांनी कमबॅक केलं अन् मैदानात उतरताच चाहत्यांचा हिरमोड

इंग्लंडमधील लीड्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 454 धावांपर्यंच मजल मारली आहे. जैसवाल (101), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी धमाकेदार फलंदाजी करत टीम इंडियाला 400 पार नेलं. परंतु साई सुदर्शन पाठोपाठ आठ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुण नायरने चाहत्यांना निराश केलं. दोघांनाही भोपळ फोडता आला नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे करुण नायरची तब्बल आठ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली. तेव्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेली “प्रिय क्रिकेट मला एक संधी दे” ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती. तसेच त्याच्या निवडीबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी सर्व उत्सुक होते. 430 या धावसंख्येवर कर्णधार शुभमन गिलची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी करुण नायर मैदानात आला. ऋषभ पंतच्या जोडीने मोठी धावसंख्या उभारण्याची त्याला सूवर्ण संधी होती. परंतु बेन स्टोक्सने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि चाहत्यांचाही हिरमोड झाला. असे असली तरी करुण नायर हा दमदार फलंदाज आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात तो धडाकेबाद फलंदाजी करेल, अशी चाहत्यांसह सर्वांना आशा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;