जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जम्मू-कश्मीरच्या चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी हिंदुस्थानचा तिरंगा फडकवत पुलाचे उद्घाटन केले. हा पूल 1.3 किमी लांबीचा असून तब्बल 359 मीटर उंचीचा आहे. पुलाची उंची पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरने अधिक आहे.

पंतप्रधान मोदी हे पहलगाम हल्ल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच जम्मू-कश्मीरला आले होते. या दौऱयात त्यांनी चिनाब पुलासह विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. पुलाच्या उद्घाटनानंतर देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेला अंजी पूल तसेच कटरामध्ये कश्मीरातील पहिल्या कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. चिनाब पूल 260 किमी प्रतितास वेगाने येणाऱया वाऱयात तसेच भूपंपाच्या झोन-5 मध्येही पूल स्थिर राहू शकतो. पुलाच्या बांधकामात 30,000 टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. सुमारे 1500 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल हिंदुस्थानच्या अभियांत्रिकी शक्तीचे प्रतीक मानला जात आहे. या पुलाच्या प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. सुरुवातीच्या प्लाननुसार पुलाचे काम 2009 पर्यंत पूर्ण होते अपेक्षित होते. मात्र वास्तवात पूल पूर्ण व्हायला तब्बल 22 वर्षांचा अवधी लागला आणि अखेरीस शुक्रवारी त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पाकिस्तान आणि चीनचे धाबे दणाणले

चिनाब पूल 40 किलो स्पह्टके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूपंपाचा सामना करण्याइतपत मजबूत आहे. तसेच या पुलामुळे कश्मीरात तैनात असलेल्या सैन्यापर्यंत शस्त्रास्त्रs, दारूगोळा, रणगाडे थेट खोऱयात पोहोचतील. बारामुल्लाला रेल्वे कनेक्शन मिळाल्याने सीमेवर रसद पोहोचणे सोपे होईल. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनचे धाबे दणाणले आहेत. हा पूल पुढील तब्बल 120 वर्षे भूपंप, पूर आणि बर्फवृष्टी आदी प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकणार आहे.

चिनाब पुलाची वैशिष्टय़े

– कश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी रेल्वेने जोडणाऱया चिनाब पुलाचा पाया फुटबॉल मैदानाच्या अर्ध्या भागाइतका आहे. पुलाच्या बांधकामात 30 हजार टन स्टीलचा वापर केला.
– पुलाच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था आहे. हिंदुस्थानी लष्कराचे जवान पुलावर कडक पहारा देणार आहेत.
– हा रेल्वे पूल पाहण्यास जितका भव्य आहे, तितकीच पुलाची बांधणी भक्कम आहे.
– या पुलावरून वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
– पुलावरून लष्करी आणि निमलष्करी दलांची हालचाल जलद होणार आहे. संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीत लष्कराची तैनाती लवकर शक्य होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;