हवेत विमानाचं डोअर धडाधड आदळत होतं, आवाजाने प्रवाशांचा जीव मुठीत! Air India च्या फ्लाइटमधील भीतीदायक अनुभव

हवेत विमानाचं डोअर धडाधड आदळत होतं, आवाजाने प्रवाशांचा जीव मुठीत! Air India च्या फ्लाइटमधील भीतीदायक अनुभव

दिल्ली ते हाँगकाँगला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-314 या बोईंग 787 विमानात 1 जून 2025 रोजी हवेत एक धक्कादायक प्रकार घडला. बोईंग 787 विमानात हवेत असताना दरवाजे धडाधड आदळल्याची घटना घडली. दरवाजा धडाधड आदळत असल्याने होणाऱ्या आवाजामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. उड्डाणाला सुमारे एक तास झाल्यावर दरवाज्यामधून हा आवाज येऊ लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवाज्याच्या सीलमधील हवेच्या दाबामुळे हा आवाज निर्माण झाला होता. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांना शांत करण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छोट्या फटीत कागदी नॅपकिन्स भरून आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधी 2019 मध्ये जपान एअरलाइन्स, 2022 मध्ये TUI एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानांमध्येही असेच प्रकार घडले होते. तज्ज्ञांच्या मते, हवेच्या दाबामुळे अशा फटींमधून हवा बाहेर पडताना असा आवाज येतो, परंतु यामुळे विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत नाही. कारण दरवाजे हवेत उघडणे अशक्य आहे.

एअर इंडियाने सांगितले की, विमान हाँगकाँगला सुरक्षितपणे उतरले आणि तपासणीनंतर सर्व सुरक्षा मानके पूर्ण असल्याचे आढळले. परतीच्या फ्लाइट AI-315 मध्ये असा कोणताही आवाज आढळला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;