Mumbai News – वाढदिवसाच्या पार्टीचा बहाणा करत बोलावलं, मग दोन तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मालाड येथील मालवणी परिसरात धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित करून मग दोन तरूणांनी 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आईला मुलीची अश्लील व्हिडिओ क्लिप मिळाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारीमध्ये घडली. नववीत शिकणाऱ्या पीडितेला तिच्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी आमंत्रित केले होते. पीडिता पार्टीसाठी मैत्रिणीच्या घरी पोहचली तेव्हा तिथे कुणीच आले नव्हते. यानंतर पीडितेची मैत्रिण कामाचा बहाणा करून घराबाहेर गेली. यानंतर एक 23 वर्षांचा तरुण पार्टीसाठी आल्याचा बहाणा करून घरी आला.
घरी कुणी नसल्याचा फायदा घेत त्या तरुणाने पीडितवेर बलात्कार केला. यादरम्यान त्याने पीडितेचा व्हिडिओही बनवला. यानंतर आरोपीने हा व्हिडिओ मित्राला पाठवला. दुसऱ्या आरोपीने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडे लैंगिक सुखाची मागणी केली.
भीतीपोटी, मुलगी एप्रिलमध्ये आरोपीला भेटण्यास गेली असता तो तिला गोराई येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर दोन्ही आरोपींनी पुढील दीड महिन्यात मुलीला वारंवार धमक्या देत लैंगिक शोषण केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List