मेक इन इंडिया नव्हे, असेंबल्ड इन इंडिया; उत्पादन घटलं, बेरोजगारी वाढली, पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची टीका

मेक इन इंडिया नव्हे, असेंबल्ड इन इंडिया; उत्पादन घटलं, बेरोजगारी वाढली, पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर जोरदार टीका केली. ‘मेक इन इंडिया’मुळे देशात उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र राहुल गांधी यांनी हा दावा फोल असल्याचे सांगत, देशातील उत्पादन क्षेत्र ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून, युवकांमधील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, असा आरोप केला.

X वर एक व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “मेक इन इंडिया योजनेमुळे देशात उत्पादन वाढल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर आहे आणि बेरोजगारी सर्वकालीन उच्चांकावर आहे. 2014 पासून देशातील उत्पादन 14 टक्क्यांनी घटले आहे आणि चीनमधून आयात दुप्पट झाली आहे.”

ते म्हणाले, “मोदीजींनी घोषणाबाजीची कला आत्मसात केली आहे, उपायांची नाही. सत्य हे आहे की आपण वस्तू असेंबल्ड करतो, आयात करतो. पण उत्पादन करत नाही. याचा फायदा चीनला होतो.”

राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाच्या आर्थिक मॉडेलवर टीका केली आणि म्हटलं आहे की, “पंतप्रधान मोदींकडे कोणतेही नवीन आयडिया नाहीत. त्यांनी शरणागती पत्करली आहे. पीएलआय योजना देखील आता शांतपणे मागे घेण्यात आली आहे. हिंदुस्थानात बदलाची गरज आहे.”

दरम्यान, राहुल यांनी नवी दिल्लीतील नेहरू प्लेस येथे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स दुरुस्त करणाऱ्या दोन तरुणांसोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी दोघांकडून त्यांच्या कामाबद्दल माहिती घेताना दिसत आहे. याचवेळी बोलताना त्यांनी ‘असेंबल्ड इन इंडिया’ हा नारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;