Mumbai News – महिलेच्या पोटातून काढला तब्बल 10.4 किलो वजनाचा ट्यूमर, सेंट जॉर्जमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

Mumbai News – महिलेच्या पोटातून काढला तब्बल 10.4 किलो वजनाचा ट्यूमर, सेंट जॉर्जमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात एका 40 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल 10.4 किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात आला आहे. मीना सोलंकी असे महिलेचे नाव असून ती दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील रहिवासी आहे. महिलेच्या पोटातून काढलेला ट्यूमर हिस्टोपॅथॉलॉजी चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. सेंट जॉर्जचे डॉक्टर सध्या हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची वाट पाहत आहेत. या चाचणीत जर कर्करोगाचे निदान झाले तर केमोथेरपीची आवश्यकता असेल डॉक्टर म्हणाले.

मीना सोलंकी ही अविवाहित असून क्रॉफर्ट मार्केट परिसरात आई आणि भावासोबत राहते. तिला काही महिन्यांपासून काही खाल्ल्यानंतर उलट्या होत होत्या आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. यानंतर एका सामाजिक कार्यकर्तीने तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी आणले. यावेळी तपासणीत तिच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याचे कळले.

पाच ते सहा बाळांना सामावून घेण्याएवढी जागा या ट्यूमरने व्यापली होती. या ट्यूमरमुळे महिलेच्या फुफ्फुसे, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येत होता, असे सेंट जॉर्जच्या डॉक्टर राजश्री कटके यांनी सांगितले. सेंट जॉर्जमधील डॉक्टरांच्या टीमने महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करत तिच्या पोटातून ट्यूमर बाहेर काढला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;