ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू

ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू

छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून व्हिलचेअर क्रिकेट टुर्नामेंटसाठी निघालेल्या एका 38 वर्षीय दिव्यांग खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर अचानक विक्रमची तब्बेत खालावली असता आपत्कालीन क्रमांकावर अनेक वेळा फोन करण्यात आला, परंतु वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे एका चांगल्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या हजरत निझामुद्दीने स्टेशनवरुन बुधवारी (4 जून 2025) रात्री विक्रम सिंग व्हिलचेअर  क्रिकेट टुर्नामेंटसाठी संघासोबत ग्वालियरला चालला होता. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने विक्रमची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंनी व सहकाऱ्यांनी तत्काळ रेल्वे हेल्पलाईनला फोन केला आणि वैद्यकीय मदतीची मागणी करण्यात आली. अनेकवेळा फोन करत मदतीची मागणी केली, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच ट्रेन 90 मिनिटे उशीरा होती. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन मथुरा स्टेशनवर पोहोचली. तोपर्यंत विक्रमचा मृत्यू झाला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हरवलेल्या 13 बालिका, 45 महिलांचा लावला शोध; शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी हरवलेल्या 13 बालिका, 45 महिलांचा लावला शोध; शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेल्या ४५ महिला...
Tejashwi Yadav – भरधाव ट्रक ताफ्यात घुसला, गाड्यांना उडवलं; थोडक्यात बचावले तेजस्वी यादव, 3 जखमी
नेरूळमध्ये लटकली पावसाळ्यापूर्वीची कामे, शिवसैनिकांची विभाग कार्यालयावर धडक
Pune news – निवडणुकीसाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा, समाविष्ट गावांसह वाढीव मतदान केंद्रांसाठी जागेचा शोध
दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा
कल्याण एपीएमसीच्या ‘कृषी मॉल’चा भूखंड खासगी व्यापारी संस्थेच्या घशात, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घपला
कोपरीत शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन