पनवेलमधील धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री, पावसाळी सहलीत नागरिकांचा हिरमोड

पनवेलमधील धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री, पावसाळी सहलीत नागरिकांचा हिरमोड

पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून गेल्याच्या किंवा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तालुक्यातील धरण क्षेत्र व धबधब्यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

पनवेल तालुक्यात गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरण असून वारदोली, कुंडी, आदई, नेवाळी असे धबधबे आहेत. तसेच तालुक्यातील हरिग्राम, धोदाणी, चिंध्रन, महोदर, शांतीवन, गाढी अशी नदीपात्र आहेत. ही सर्व पर्यटनस्थळे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांवर गर्दी करतात. मात्र अशा ठिकाणी काही हुल्लडबाज आणि दारुडेदेखील मौजमजा करण्यासाठी येतात. दरम्यान धरण, धबधबे किंवा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या पावसाळी पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्या आदेशान्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे.

“पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दुर्घटना होत असल्याने त्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच पोलिसांनी उभारलेल्या फरकांवरील सूचनांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”

गजानन घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;