काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम

काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम

रोज सकाळी-संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो, धूप, अगरबत्ती लावतो. पण तुम्हाला माहितीये का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. होय, यामुळे नकळत आरोग्याला मोठे नुकसान होत आहे. जर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले पण हे खरं आहे, अगरबत्ती लावल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूर आरोग्यासाठी अनेक मोठे धोके निर्माण करू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अगरबत्ती आणि धूपबत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलीएरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) चा फुफ्फुसांवर खूप वाईट परिणाम होतो. धार्मिक विधी आणि पूजागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अगरबत्ती आणि धुपामुळे आरोग्याला काय नुकसान करतात ते जाणून घेऊया.

अगरबत्ती जाळल्याने आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम

फुफ्फुसांवर वाईट परिणाम
अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुफ्फुसांना हानी पोहोचवतात. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की अगरबत्ती आणि धुपामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) चा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. त्यातून निघणाऱ्या धुराचा शरीराच्या पेशींवर वाईट परिणाम होतो आणि तो सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी असतो. अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुफ्फुसांच्या पडद्यांमध्ये संसर्ग निर्माण करू शकतात. त्याच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या पेशींमध्ये अॅलर्जी होऊ शकते.

त्वचेची अ‍ॅलर्जी
अगरबत्ती आणि अगरबत्तीचा जास्त काळ वापर केल्याने डोळे आणि त्वचेशी संबंधित अॅलर्जी होऊ शकते. या गोष्टी जाळल्याने निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांना जळजळ होते. तर संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या धुराच्या संपर्कात येताच त्वचेला खाज येऊ शकते.

मेंदूवर वाईट परिणाम होतो
सुगंधित उदबत्ती आणि धुपामधून निघणाऱ्या रासायनिक धुराचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्याने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

श्वसन क्षमतेवर वाईट परिणाम
सीपीसीबी पॅनेलनुसार, या धुराचा श्वसनसंस्थेवरही परिणाम होतो. अनेक संशोधनांनुसार, अगरबत्तीच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने श्वसन क्षमतेवर 30 टक्के परिणाम होऊ शकतो असही म्हटलं जातं. अगरबत्तीच्या धुरात असलेले कण, वायू आणि सेंद्रिय संयुगे श्वसनमार्गाद्वारे शरीरात पोहोचल्यावर वायुमार्ग कमकुवत करतात.

कर्करोगाचा धोका
अगरबत्ती आणि धुपाच्या धुराचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर विशेषतः वाईट परिणाम होतो. या धुरात जास्त काळ राहिल्याने दमा, सीओपीडी, फुफ्फुसांचा कर्करोग, श्वासनलिकेचा कर्करोग, स्मृतिभ्रंश, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो

पर्याय काय?
सुगंधी अगरबत्ती घेताना एकतर त्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या असतील याची खात्री करून घ्या किंवा घरात देवाला वाहिलेली फूले सुकवून त्यात तूप, कापूर, वैगरे नैसर्गिक घटक वापरून त्यापासून धुपकांडी तयार करू शकता.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इस्रायल युद्धादरम्यान अयातुल्ला अली खोमेनी यांनी उत्तराधिकारी केले जाहीर, मुलाच्या नावाचा समावेश नाही इस्रायल युद्धादरम्यान अयातुल्ला अली खोमेनी यांनी उत्तराधिकारी केले जाहीर, मुलाच्या नावाचा समावेश नाही
इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आणि इस्रायलकडून हत्येच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आपले संभाव्य उत्तराधिकारी म्हणून...
प्रियकराच्या साथीने पतीची हत्या; दोन दिवस मृतदेह गाडीतून फिरवला; उत्तरप्रदेशमध्ये धक्कादायक घटना
ब्राझीलमध्ये हॉट एअर बलूनला भीषण आग, दुर्घटनेत 8 पर्यटकांचा मृत्यू
अमेरिकेतील नॉर्थ डकोटामध्ये वादळाचा तडाखा, तीन जणांचा मृत्यू
वृद्ध आई-वडिलांच्या घरात राहण्यासाठी मुलगा, सून जबरदस्ती करु शकत नाहीत; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
IND Vs ENG 1st Test – गिल-पंत-जैसवाल आणि 22 वर्षांपूर्वी तेंडुलकर-द्रविड-गांगुली; काय आहे या मैदानाचा इतिहास?
Akola News – प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांची आत्महत्या, विषारी इंजेक्शन टोचून संपवले जीवन