जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ; फारुख अब्दुल्ला यांचा केंद्राला इशारा

जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ; फारुख अब्दुल्ला यांचा केंद्राला इशारा

जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पुन्हा एकदा जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा लवकर बहाल करण्याची मागणी केली आहे. जर यात आणखी विलंब झाला तर त्यांच्या पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे ते म्हणाले. अब्दुल्ला फारुख म्हणाले की, विलंब झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

पहलगाममध्ये पत्रकारांशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू आणि कश्मीर सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले आहेत. मला आशा आहे की, जेव्हा राज्याचा दर्जा बहाल होईल तेव्हा आपल्याला खऱ्या प्रशासनासाठी आवश्यक असलेले प्रशासकीय अधिकार देखील मिळतील. ते म्हणाले की, राज्याचा दर्जा मिळाल्याने सर्व अधिकार सरकारकडे येतील. ते म्हणाले की, लोकांना मंत्री हवे आहेत, परंतु राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा दर्जा बहाल होणे, हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि गरज पडल्यास पक्ष सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावेल. ते म्हणाले की, आम्ही राज्याचा दर्जा बहाल होण्याची वाट पाहत आहोत, जर असे झाले नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ते म्हणाले की, राज्याचा दर्जा हा आमचा अधिकार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;