Pandharpur Wari 2025 – भक्तीचा मळा! भाविकांची गर्दी, वारकऱ्यांची सेवा

Pandharpur Wari 2025 – भक्तीचा मळा! भाविकांची गर्दी, वारकऱ्यांची सेवा

‘भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||’ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. 

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

त्यांच्या या प्रवासात विविध माध्यमांतून त्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था, तरुण-तरुणी, शाळकरी मुलं सुद्धा हिरहिरीणे सहभाग घेत आहेत. पुण्यातील मुक्कामात शाळकरी मुलांनी वारकऱ्यांना जेवणं वाढलं. 

संसाराच्या भारातून उसंत घेत माताभगिणी ‘माउली… माउली…‘ च्या जयघोष वारीचा आनंद घेत आहेत. 

टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत देहभान विसरून महिला फुगडी खेळण्यात तल्लीन झाल्या आहेत.  

या संपूर्ण प्रवासात वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. 

महाविद्यालयीन तरुण-तरुणी वेळात वेळ काढून वारीत सहभागी झाल्या. 

श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.  

विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी एकमेकांची सेवा करत वारकऱ्यांचा प्रवास सुरू आहे. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;