‘स्टारलिंक’ची हिंदुस्थानात एंट्री
‘एक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी हिंदुस्थानच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे. मस्क यांच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला हिंदुस्थानात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या कंपनीकडून ग्राहकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवली जाईल. दूरसंचार विभागाकडून लायसन्स मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. याआधी एयरटेलच्या युटेल सॅट वनवेब आणि रिलायन्स जिओला परवानगी देण्यात आली होती. स्टारलिंक कंपनीने लायसन्स मिळाल्यानंतर ट्रायल स्पेक्ट्रमसाठी अर्ज केल्याचे समजते. येत्या 15 ते 20 दिवसांत स्पेक्ट्रम वाटप होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List