Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?

Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 वर्षांनी आयपीएलचे विजेतपद पटकावले. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला, तेव्हा खेळाडूंना आणि विशेष करुन विराट कोहलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी चहूबाजूंनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने चाहते आल्याने एकच गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका स्थानिक नागरिकाने टीम इंडिया आणि विराट कोहलीवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत RCB ने PBKS चा 6 धावांनी पराभव करत IPL 2025 चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूत दाखल झाला. प्रथम विधानसभा परिसरात कर्नाटक सरकारने त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर संपूर्ण संघ चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला. दोन्ही ठिकाणी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांना गर्दीवर ताबा मिळवणं कठीण झालं आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा जीव गेला आणि 50 जण जखमी झाले आहे. त्यानंतर सर्व स्तरातून RCB वर टिका होऊ लागली. कर्नाटक सरकारने RCB मॅनेजमेंट, कर्नाटक क्रिकेट संघाला आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA ला दोषी ठरवलं. त्यानंतर क्यूबन पार्क पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतलं आहे. आता स्थानिक व्यक्ती एचएम वेंकटेशने विराट कोहलीविरोधात क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;