नेरूळमध्ये लटकली पावसाळ्यापूर्वीची कामे, शिवसैनिकांची विभाग कार्यालयावर धडक

नेरूळमध्ये लटकली पावसाळ्यापूर्वीची कामे, शिवसैनिकांची विभाग कार्यालयावर धडक

पावसाळा सुरू झाला असला तरी नेरूळ परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे अद्यापही लटकली आहेत. नाले आणि गटरांची साफसफाई व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात अनेक भागांत पाणी साचले. याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयावर धडक दिली आणि विभाग अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. पालिका फक्त ठरावीक प्रभागांमध्येच विकासकामांचा पाऊस पाडत आहे. विकासकामांतील या भेदभावामुळे नेरुळ विभागात पावसाळ्यापूर्वीची कामे लटकली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई संपर्कप्रमुख एम. के. मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी गुरुवारी नेरुळ विभाग कार्यालयावर धडक दिली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, मनोज इसवे, उपजिल्हा संघटक उषा रेणके, वसुदा सावंत, उपशहरप्रमुख सतीश रामाणे, शिवाजी महाडिक, अॅड. कौस्तुभमोरे, विभागप्रमुख तानाजी जाधाव, बाबू तळेकर, लक्ष्मण पोपळघट, दीपक परब, हरिश इंगवले, श्रीकांत भोईर, सुचिता धुरी, राजेश पुजारी, राकेश महाऊलकर, शीतल गुंजाळ, किर्ती सुर्वे, डॉ. सुनील सावंत, बाळकृष्ण जाधव, प्रकाश कळगुटकर, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;