अजित पवार पालकमंत्री असणाऱ्या बीडमध्ये सहा महिन्यांत शंभर शेतकऱ्यांनी गळफास घेतला

अजित पवार पालकमंत्री असणाऱ्या बीडमध्ये सहा महिन्यांत शंभर शेतकऱ्यांनी गळफास घेतला

ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या बीड जिह्याचे पालकमंत्री होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहा महिने झाले. या कालावधीत बीड जिह्यातील शंभर शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. कर्ते पुरुष गेल्याने ही कुटुंबे उघडय़ावर आली. जिह्याची अशी अवस्था असताना अजित पवार बीडमध्ये विमानतळ उभारण्याच्या विचारात आहेत.

शेतीत काही पिकत नाही, हाताला काम नाही. त्यामुळे साडेसहा लाख मजूर दरवर्षी बीड जिह्यातून संपूर्ण राज्यात ऊसतोडीसाठी जातात. आर्थिक परिस्थिती हलाखीची होत असताना बीड जिह्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिह्याचे वातावरण ढवळून निघाले आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीड जिह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली. बीड जिह्याची आता बारामती होईल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची होती. मात्र तसे काही झाले नाही, उलट गुन्हेगारी झपाटय़ाने पसरली, गुन्हेगारीत मोठी वाढ झाली. शेतकऱयांकडेही अजितदादांचे साफ दुर्लक्ष राहिले. सहा महिन्यांतच बीड जिह्यातील तब्बल शंभर शेतकऱयांनी आर्थिक अडचणीमुळे आणि नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडमध्ये विमानतळ उभारू इच्छिणाऱया अजित पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱऱयांकडे साफ दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे.  मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने कांदा, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. कांद्यांच्या पिकात चिखल झाला. हजारो शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. पालकमंत्री आणि सरकार यांचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष आहे.

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

सततची नापिकी, वाढता लागवड खर्च, शेत मालाला कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणा या कारणांमुळे सहा महिन्यांमध्ये शंभर शेतकऱयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱयांना वाऱयावर सोडले. पालकमंत्री अजित पवार आणि सरकार अपयशी ठरले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;