Norway Chess 2025 – गुकेशने दिले स्वतःलाच बर्थ डे गिफ्ट

Norway Chess 2025 – गुकेशने दिले स्वतःलाच बर्थ डे गिफ्ट

हिंदुस्थानचा जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशने ‘नॉर्वे बुद्धिबळ 2025’ स्पर्धेत सुरूवात काहीशी खराब झाली होती. मात्र, गुकेशने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला हरवून पहिला विजय मिळवला होता आणि आता 19 व्या वाढदिवशी त्याने स्वतालाच बर्थ डे गिफ्ट देत चौथ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला टाय-ब्रेक सामन्यात पराभूत करून आणखी एक विजय नोंदवला.

स्पर्धेच्या सुरूवातीला गुकेशला अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन आणि नंतर देशबांधव अर्जुन इरिगॅसीविरुद्ध सलग दोन पराभव पत्करावे लागले होते. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करत हिकारू आणि फॅबियानोला पराभूत केले. अमेरिकेच्या फॅबियानोविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांसह सामना अनिर्णित ठेवला. नंतर नियमांनुसार कोणत्याही किंमतीत टायब्रेकमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह जिंकणे आवश्यक असल्याने त्याने झुकेटों र्ट ओपनिंगचा अवलंब केला. 15 व्या चालीनंतर कारुआना मध्यभागी गुकेशच्या अतिरिक्त मोहऱ्याच्या हालचालींचे योग्य मूल्यांकन करू शकला नाही आणि गुकेशने आघाडी घेतली. 50 चालींपर्यंत चाललेल्या सामन्यात गुकेशने शानदार विजय नोंदवला. या विजयासह गुकेश आता 4.5 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

मॅग्नस कार्लसनने हिंदुस्थानच्या अर्जुन एरिगाईसीला सरळ क्लासिकल सामन्यात हरवले आणि 8 गुणांसह आघाडी घेतली. तर दुसऱ्या सामन्यात अमेरिकेचा हिकारू नाकामुरा चीनच्या वेई यीकडून टायब्रेकमध्ये पराभूत झाला. पराभव झाल्यानंतरही फॅबियानो 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, हिकारू 5.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

महिला गटात, हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पीला टाय-ब्रेकमध्ये विश्वविजेत्या जू वेन्जुनकडून पराभव पत्करावा लागला. तर आर वैशालीने टाय-ब्रेकमध्ये युक्रेनच्या अण्णा मुझीचुकचा पराभव केला. हम्पी आणि अण्णा दोघेही सध्या 7 गुणांसह एकमेव आघाडीवर आहेत, तर या विजयामुळे वैशालीचे स्थान निश्चितच सुधारले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;