नायजेरियात मुसळधार पावसामुळे पूर, 88 नागरिकांचा मृत्यू

नायजेरियात मुसळधार पावसामुळे पूर, 88 नागरिकांचा मृत्यू

मुसळधार पावसाने नायजेरियात हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे नायजर राज्यात पुराने वेढले असून बाजारपेठ आणि घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत.

प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे मिन्ना येथील आपत्कालीन कार्यालयाचे प्रमुख हुसैनी इसाह यांनी सांगितले. अनेक लोक अजूनही संकटात आहेत. आतापर्यंत 88 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता इसाह यांनी वर्तवली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा दबाव वाढल्याने जवळच्या एका शहरात धरण फुटले. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;