Sindhudurg News – आठवडाभरापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, देवगड पोलिसांकडून तपास सुरू

Sindhudurg News – आठवडाभरापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, देवगड पोलिसांकडून तपास सुरू

आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या देवगडमधील हिंदळे भंडारवाडी येथील इसमाचा मृतदेह आढळला आहे. अरुण साबाजी सावंत (57) असे मयत इसमाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हिंदळे गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्र किनारी खडकात सावंत यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जातो, असे पत्नीला सांगून अरुण सावंत हे 23 मे रोजी सायंकाळी घरातून निघून गेले होते. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते कुठेच न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन सावंत याने पोलीस स्थानकात दिली होती.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी कुजलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची फिर्याद नितीन सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;