ज्वेलर्सच्या दुकानात  हातसफाई करणाऱ्याला यूपीतून अटक

ज्वेलर्सच्या दुकानात  हातसफाई  करणाऱ्याला यूपीतून अटक

ज्वेलर्सच्या दुकानातील विंडो एसी काढून दुकानात प्रवेश करून सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरणाऱ्याला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मुकीम मोतीम खान असे त्याचे नाव आहे. पोलिसांना तपासादरम्यान मुकीम हा उत्तर प्रदेशला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढत उत्तर प्रदेश गाठून त्याला अटक केली.

मालाड मामलेदार वाडी परिसरात असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानाचा विंडो एसी काढून चोरटय़ाने दुकानात प्रवेश करून 5 लाखांचे दागिने घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला होता. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी  वरिष्ठ निरीक्षक विजय कुमार पन्हाळे सहायक पोलीस निरीक्षक दीपक रायवाडे, उप निरीक्षक तुषार सुखदेवे यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाने 150 सीसीटीव्हींचा तपास करून चोरटय़ाचा माग काढला. त्यावेळी तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून मुकीमला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;