बांधकाम विभागातील इंजिनिअरच्या घरावर पडली धाड, त्याने खिडकीतून फेकली नोटांची बंडलं

बांधकाम विभागातील इंजिनिअरच्या घरावर पडली धाड, त्याने खिडकीतून फेकली नोटांची बंडलं

ओडिशातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य इंजिनिअरच्या घरावर तसेच त्याच्याशी संबंधित सात ठिकाणांवर व्हिजिलन्स अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड घातली. या धाडीत अधिकाऱ्यांना कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. दरम्यान या इंजिनिअरने व्हिजिलन्स अधिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी घराच्या खिडकीतून नोटांची बंडलं खाली फेकल्याचे देखील समोर आले आहे.

बैकुंठ नाथ सारंगी असे त्या इंजिनिअरचे नाव असून ते सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अधिकारी आहेत. भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झॉटिका सोसायटीतील फ्लॅट क्रमांक C-102 मध्ये ते राहतात. या घरवर तसेच इतर काही फ्लॅट व कार्यालयांवर व्हिजिलन्स अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या. त्यात अंगुल येथील घरातून एक कोटीची तर भुवनेश्वर येथील फ्लॅटमधूल 1.1 कोटींची रोकड जप्त केली आहे. अद्याप इतर ठिकाणचा तपास सुरू आहे. प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समोर आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;