दोन महिन्यांपासून महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवले; पोलिसांनी केली सुटका, कोल्हापुरात संतापजनक घटना

दोन महिन्यांपासून महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवले; पोलिसांनी केली सुटका, कोल्हापुरात संतापजनक घटना

गेल्या दोन महिन्यांपासून घरातच एका 40 वर्षीय दिव्यांग महिलेला चक्क साखळदंडाने बांधून ठेवल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली. विशेष म्हणजे, राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या वसाहतीतील ही धक्कादायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तत्परतेने धाव घेत त्या पीडितेची सुटका केली. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. कोल्हापुरात या घटनेने खळबळ उडाली असून, संवेदनशील पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे. दरम्यान, महिलेचा भाऊ, भाचा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या दौलतनगर परिसरात सारिका हनुमंत साळी ही महिला आपला भाऊ, भावाची पत्नी आणि भाचा यांच्यासह वास्तव्यास आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही महिला गतिमंद आणि दिव्यांग असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचे कारण सांगत दोन महिन्यांपासून तिला साखळदंडाने बांधून ठेवले होते. खबऱ्यामार्फत ही माहिती पोलिसांना मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे महिला पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला अंगभर साखळदंड बांधण्यात आले होते. शिवाय तीन कुलपेदेखील लावण्यात आली होती.

शिवसेना उपनेते संजय पवार यांचीही धाव

या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच शिवसेना पक्षाचे उपनेते व कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनीही पीडित महिलेचा भाचा अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला चांगलेच सुनावले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;