भाजपचा युटर्न! घर घर सिंदूर कॅम्पेन केले रद्द? लोकांच्या टीकेनंतर घेतला निर्णय?

भाजपचा युटर्न! घर घर सिंदूर कॅम्पेन केले रद्द? लोकांच्या टीकेनंतर घेतला निर्णय?

ऑपरेशन सिंदूरला एक महिना पूर्ण होण्या्च्या पार्श्वभूमीवर तसेच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने भाजपकडून देशभरात घरात घरात जाऊन सिंदूर वाटले जाणार होते. भाजपकडून हे कॅम्पेन राबण्यात येणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावरून मोदी सरकारवर टीकाही झाली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतूनही या कॅम्पेनवर जोरदार टीका केली. तसेच मोदीजी त्यांच्या पत्नीला सिंदूर कधी देणार, असा बोचरा सवाल त्यांनी केला. तसेच इतर विरोधी पक्षांनी देखील भाजपच्या या कॅम्पेनवर सडकून टीका केल्यानंतर जनतेतूनही भाजपच्या या सिंदूर कॅम्पेनवर टीका होऊ लागली.

जनतेने टीका केल्यानंतर आता भाजपने याबाबत यूटर्न घेतला असून आम्ही असे कोणत्याही प्रकारचे कॅम्पेन करणार नसल्याचे भाजपने सांगितले आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी हे भाजपला ट्रोल करण्यासाठी अफवा पसरवल्याचा दावा केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;