कांदिवलीत सोमवार आणि मंगळवारी 17 तास पाणीपुरवठा बंद
मुंबई महापालिका कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवणार आहे. त्यामुळे सोमवार, 2 जूनला दुपारी 1.30 वाजेपासून ते मंगळवार 3 जूनपर्यंत सकाळी 7.30 वाजेपर्यंत कांदिवली पूर्व आणि पश्चिम भागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेचे केले आहे. आर दक्षिण विभाग ः ठाकूर गाव, समतानगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List