पालिका कंत्राटदाराने रखडवले 1200 कर्मचाऱ्यांचे पगार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

पालिका कंत्राटदाराने रखडवले 1200 कर्मचाऱ्यांचे पगार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने 1200 कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांचे वेतन दिलेले नाही. हे वेतन तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात नाही तर कर्मचारी, कामगार ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांना दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत डी. एस. इंटरप्रायझेस पंत्राटदाराकडून परिचारिका, लॅब टेक्निशिअन्स, फार्मासिस्ट, डी. ओ. या अन्वये 1200 कर्मचारी पुरवण्यात येत आहेत. मागील आठ वर्षे या पंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांमध्ये कामगार, कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावत आहेत, मात्र तरीही कामगार, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मागील तीन महिन्यांपासून या 1200 कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात आहे. याबाबत पालिका अधिकारी आणि पंत्राटदाराची भेट घेऊन कामगारांचा पगार देण्यासाठी निवेदने देण्यात आली, मात्र त्याकडे पालिका अधिकारी आणि या पंत्राटदारो लक्ष न दिलेले नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसांत कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्या मान्य केल्या नाहीत तर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या  

2018 सालापासून वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा भरपगारी द्यावी, मुंबईतील सर्व डी. एस. कंपनीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना एनयूएचएम अभियानांतर्गत नियुक्ती देण्यात यावी, कंपनीमार्फत देण्यात येणारे इन्शुरन्स बंद करून त्याऐवजी राज्य सरकारचे कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) लागू करावे, बोनस (सानुग्रह अनुदान) द्यावे, नैमित्तिक रजा मिळावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;