मंदिराच्या दानपेटींवर डल्ला आरोपीला 3 तासात अटक

मंदिराच्या दानपेटींवर डल्ला आरोपीला 3 तासात अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून नुकताच कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याला नवीन दुचाकी घेण्याचा मोह अनावर झाला. लवकर दुचाकी घेण्यासाठी त्याने थेट मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारला. चोरी करून तो शिताफीने सटकला, पण पंतनगर पोलिसांनी तीन तासांत त्याला बेडय़ा ठोकल्या.

गणेश भुक्तर ऊर्फ गण्या (31) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार प्रकरणात गणेशला मार्च 2018 रोजी अटक झाली होती. त्यानंतर अलीकडे तो शिक्षा भोगून बाहेर आला. बाहेर येताच त्याला दुचाकी घेण्याची लालसा झाली. पण त्याकरिता पैसा नसल्याने त्याने घाटकोपर पूर्वेकडील मुख्य सहकार मार्पेटमधील भवानी मातेच्या मंदिरातील दानपेटींना लक्ष्य केले. त्याने शिताफीने तीन दानपेटय़ा पह्डून हजारो रुपयांची चोरी केली. यासंदर्भात पंतनगर पोलिसांनी तत्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्यासाठी तीन पथके तैनात करून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या तीन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;