भायखळ्यात रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

भायखळ्यात रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

मुंबईतील भायखळा येथे एका रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्याचा काही भाग बुधवारी कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. यापैकी एकीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली असून नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नाजिया खान (वय – 35) असे मृत महिलेचे नाव असून खुशमा खातून असे उपचार सुरू असलेल्या महिलेचे नाव आहे, अशी माहिती बीएमसीने दिली.

भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिर या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा काही भाग बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेमध्ये खुशमा खातून आणि नाजिया खान या दोन महिला जखमी झाल्या होत्या. इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी, बीएमसी वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलांना उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल केले. नाजिया खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. तर खुशमा यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ही इमारत 1969 पूर्वी बांधण्यात आली असून सेस श्रेणीत ठेवण्यात आलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;