IPL 2025 – मागच्या वर्षी फायनल खेळलेले चार खेळाडू आहेत RCB च्या ताफ्यात, यंदातरी संपणार का विजेतेपदाचा दुष्काळ?

IPL 2025 – मागच्या वर्षी फायनल खेळलेले चार खेळाडू आहेत RCB च्या ताफ्यात, यंदातरी संपणार का विजेतेपदाचा दुष्काळ?

आयपीएलचा 18वा हंगाम RCB साठी दमदार ठरला आहे. संघाने पहिल्या सामन्यापासूनच धमाकेदार कामगिरी करत एक एक विक्रम मोडीत काढले आणि आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज सारख्या चॅम्पियन संघाना त्यांच्याच घरात जाऊन धुळ चारण्याची किमया संघाने साधली. प्ले ऑफमध्ये अगदी थाटात प्रवेश केला आणि प्ले ऑफच्या सामन्यात पंजाबचा 8 विकेटने धुव्वा उडवत संघाने 9 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे मागच्या वर्षी आयपीएलची फायनल खेळलेले चार खेळाडू RCB च्या ताफ्यात आहेत.

IPL 2024 ची फायनल कोलकाता नाईट राडयर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या संघांमध्ये झाली होती. या सामन्यात कोलकताना 8 विकेटने सामना जिंकत विजेतेपद पटकावले होते. यावेळी कोलकाताच्या संघात फिल सॉल्ट आणि सुयश शर्मा या खेळाडूंचा समावेश होता. हे दोघेही सध्या बंगळुरूमध्ये आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि मयंक अग्रवाल हे हैदराबादच्या संघाचा भाग होते, जे यंदा बंगळुरूकडून खेळताना दिसत आहेत. हे चार खेळाडू RCB साठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. फिल सॉल्टने वेळोवेळी संघाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. तसेच भुवनेश्वर कुमार आणि सुयश शर्मा यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजीची झलक साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दाखवली आहे. देवदत्त पडिकलच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून मयंक अग्रवालला संधी मिळाली आणि त्यानेही साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी केली, त्यामुळे संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिला. हे चारही खेळाडू RCB साठी आतापर्यंत तरी लकी ठरले आहेत. त्यामुळे यंदातरी RCB विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.

कळी खुलली! RCB ने फायनलमध्ये धडक मारल्यावर कॅमेरा अनुष्काकडे वळला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;