NEET PG Exam – नीट पीजी परीक्षा एका शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET PG Exam – नीट पीजी परीक्षा एका शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नीट पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. ही परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला दिले आहेत. परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नीट पीजीची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करावी, असे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेतील मनमानी चालणार नाही, असे खंडपीठाने निर्णय देताना नमूद केले.

नीट पीजी परीक्षा येत्या 15 जूनला होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जरी फक्त एक किंवा दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली असली तरी त्यांचा युक्तिवाद बरोबर असेल तर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल. गेल्या वर्षी विशेष परिस्थितीत परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. परंतु आता हा सामान्य नियम होऊ शकत नाही. नीट पीजी परीक्षेला अजून दोन आठवड्यांहून अधिक वेळ शिल्लक आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडे नवीन परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यासाठी तसेच एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपावर परिणाम होतो. त्याचा थेट परिणाम निकाल आणि रँकिंगवर होतो, असा दावा करीत विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचा आदेश राष्ट्रीय परीक्षा मंडळाला देऊन देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;