विकास मंदावला, जीडीपी 6.5 टक्क्यांवर

विकास मंदावला, जीडीपी 6.5 टक्क्यांवर

सरलेल्या वर्षात हिंदुस्थानचा आर्थिक विकास मंदावल्याचे दिसून आले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत मंदावला. त्यामुळे 2024-25 मध्ये देशाचा विकास दर (जीडीपी) 6.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील विकास दराच्या दुलनेत तो 8.4 टक्क्यांनी कमी आहे. तर गेल्या चार वर्षांचा विचार केल्यास हा नीचांकी दर आहे. या उलट गेल्या वर्षी विकास दर 9.2 टक्के इतका होता. सांख्यिकी विभागाच्या सुधारित अंदाजानुसार भारताचा विकास दर 6.5 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील. हा विकास दर लक्षणीयरीत्या कमी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मेक इन इंडियाची घोषणा करून दहा वर्षे झाली तरी मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास दराची बरोबरी करणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;