शाकाहारी व्यक्तींनी आहारात उडदाच्या डाळीचा समावेश का करायला हवा, वाचा सविस्तर

शाकाहारी व्यक्तींनी आहारात उडदाच्या डाळीचा समावेश का करायला हवा, वाचा सविस्तर

आपल्या स्वयंपाकघरातील उडदाची डाळ ही प्रथिनांचे भंडार आहे. आपण स्वयंपाकघरातील प्रत्येक डाळींचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. उडदाच्या डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे याला सुपरहूड असेही म्हटले जाते. उडदाची डाळ ही प्रामुख्याने मेदूवडा, डोसा किंवा दाल मखनीपुरती वापरली जाते. परंतु वास्तविक पाहता, या डाळीचे या व्यतिरिक्तही खूप उपयोग आहेत.

उडदाच्या डाळीत प्रथिनांचे भांडार असते, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम स्रोत आहे. त्यात केवळ उच्च दर्जाचे प्रथिनेच नाहीत तर ते शरीरात स्नायूंच्या वाढीसाठी सुद्धा ही डाळ पोषक मानली जाते. दररोज १ वाटी उडदाची डाळ खाल्ल्याने, आपल्या शरीराची प्रथिनांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

 

उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील आढळतात. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. ही डाळ विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी खूप फायदेशीर मानली जाते.

उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे पचन राखण्यास मदत होते. हे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते आणि आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते.

उडदाच्या डाळीत आढळणारे कार्बोहायड्रेट्स शरीराला बराच काळ ऊर्जा प्रदान करतात. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला किंवा दुपारच्या जेवणात ही डाळ खाणे खूपच फायदेशीर आहे.

उडदाची डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय, त्यात असलेले फायबर आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;