रत्नागिरी जिल्ह्यातील तीन धरणात 100 टक्के पाणीसाठा

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन धरणात 100 टक्के पाणीसाठा

ऐन मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेवर,पंचनदी आणि शीळ ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. आठ धरणांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने मे महिन्याच्या अखेरीस भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईतून ग्रामस्थांची सुटका झाली. शीळ धरण मे महिन्यातच भरल्याने रत्नागिरी शहरावरील पाणीटंचाई आणि पाणी कपातीचे संकट टळले आहे.

मे महिन्यात अनेक धरणातील पाणीसाठा आटतो.काही धरणे कोरडी पडतात.यंदा मात्र मे महिन्यात आठवडाभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यातील सोंडेवर,पंचनदी आणि शीळ हि तीन धरणे शंभर टक्के भरली.गुहागर,फणसवाडी,मालघर,खोपड,आंबतखोल,व्हेळ,ओझर,चिंचवाडी याधरणात 75 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टक्के)
पणदेरी. 42.42
तिडे 67.14
सोंडेवर. 100
पंचनदी. 100
आवाशी. 14.54
पिंपळवाडी. 38.16
कोंडीवली. 51.41
नातूवाडी. 28.44
पिंपर. 46.94
गुहागर. 96.20
अडरे. 54.15
असुर्डे. 38.20
गडनदी. 64.18
निवे. 23.38
शीळ. 100
मुचकुंदी. 39.71
झापडे. 70.07
अर्जुना 43.56
चिंचवाडी. 79.17

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;