तिन्ही सेनाप्रमुखांनी आयपीएल फायनलचे निमंत्रण नाकारले

तिन्ही सेनाप्रमुखांनी आयपीएल फायनलचे निमंत्रण नाकारले

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळाने आयपीएलच्या अंतिम सामन्यास तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. 3 जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱया या सामन्यास उपस्थित राहण्यास त्यांनी नकार दिला आहे.

‘बीसीसीआय’कडून ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंदोत्सव अहमदाबाद येथे होणाऱया आयपीएलच्या अंतिम सामन्याच्यावेळी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल प्रीत सिंग आणि भारतीय सशस्त्र दलातील उच्च अधिकारी आणि सैनिकांना आमंत्रित केले आहे. परंतु, तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आयपीएल फायनलसाठी बीसीसीआयने स्टेडियमवर एक हजार सैन्य अधिकारी, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची बसण्याचीही व्यवस्था  केली होती. तसेच मैदानावर असलेल्या स्क्रीनवर हिंदुस्थानच्या वीरगाथेचे दर्शनही घडवले जाणार होते. मात्र हे तिन्ही सेनाप्रमुख येणार नसल्याचे कळताच बीसीसीआयने आपल्या कार्यक्रमात बदल केला आहे. या सोहळय़ात प्रसिद्ध सिनेगायक देशभक्तिपर गाणी सादर करून उपस्थित लाखो क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत हिंदुस्थानी सैन्याच्या शौर्याला मानाचा मुजरा करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;