तु पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे…; मित्र उडवायचे खिल्ली, तरुणाने उचललं टोकाच पाऊल

तु पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे…; मित्र उडवायचे खिल्ली, तरुणाने उचललं टोकाच पाऊल

“तु पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे”, असं म्हणत गावातील मित्र मंडळी संतोषची (बदललेलं नाव) वारंवार खिल्ली उडवत होते. त्यामुळे संतापलेला संतोष रागाच्या भारात थेट दुमजली घराच्या छतावर जाऊन ठाण मांडून बसला. छतावरून उडी मारत जीव देण्याची धमकी देऊ लागला. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बऱ्याच वेळांनी तो छतावरून खाली आला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सिरौली पोलीस स्टेशन परिसरातील 25 वर्षांच्या संतोषला गावातील मित्र मंडळी पागल म्हणून चिडवत असतं. त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड राग होता. अशातच 40 दिवसांपूर्वी त्याचे माधूरीशी (बदललेलं नाव) लग्न झालं. माधूरी दिसायला सुंदर होती. त्यामुळे गावातील तरुण संतोषला माधुरीच्या सुंदरतेवरून चिडवायला लागले. “तुझी बायको सुंदर आहे, तु पागल आहेस”, असं वारंवार त्याची खिल्ली उडवू लागले त्यामुळे संतोषला राग अनावर झाला आणि त्याने बुधवारी (28 मे 2025) गावातील दुमजली घराच्या छतावर जाऊन ठाण मांडलं आणि रडत रडत जीव देण्याची धमकी देऊ लागला. संतोषला छतावर पाहून गावातील नागरिक चांगलेच घाबरले आणि त्यांनी त्याला खाली येण्याची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतोष कोणाचच ऐकायला तयार नव्हता.

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती योग्यरित्या हाताळत संतोषला चांगल्या पद्धतीने समजावलं आणि त्याला छतावरून खाली आणण्यात यश आलं. त्यानंतर त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;