Mumbai Hit & Run – जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर डंपरची स्कूटरला धडक, महिलेचा जागीच मृत्यू; आरोपी फरार

Mumbai Hit & Run – जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर डंपरची स्कूटरला धडक, महिलेचा जागीच मृत्यू; आरोपी फरार

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर शुक्रवारी भरधाव डंपरने जोरदार स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. चंदा माने असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर डंपर चालक पळून गेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

चंदा माने ही महिला स्कूटरवरून जात असताना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मागून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात चंदा जागीच जखमी झाली. आसपासच्या लोकांनी तात्काळ आपत्कालीन सेवांना माहिती दिली. जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;