वांग्याची भाजी खाल्ल्याने खरोखरच मूतखडा होण्याचा धोका वाढतो का? वाचा सविस्तर

वांग्याची भाजी खाल्ल्याने खरोखरच मूतखडा होण्याचा धोका वाढतो का? वाचा सविस्तर

वांग्याची भाजी ही अशी भाजी आहे, जी अनेकांना आवडते. परंतु काही व्यक्ती मात्र या भाजीला नाक मुरडतात. वांग्याच्या भाजीपासून भरीत, भरली वांगी असे विविध प्रकार आपण बनवु शकतो. परंतु अनेकांना असे वाटते की, वांग्यामुळे मुतखडा होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळेच वांग्याची भाजी आवडत असूनही खाल्ली जात नाही. तर वांग्याची भाजी ही प्रमाणात खाल्ल्यास मूतखडा होत नाही हे आता तज्ज्ञांनी सांगितले आहे.

वांग्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी-12 आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. ही कमी कॅलरी असलेली भाजी आहे. ही भाजी पचनासाठी उत्तम मानली जाते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

 

वांग्यामध्ये ऑक्सलेट नावाचे संयुग आढळते. ऑक्सलेट शरीरात प्रवेश करू शकते आणि कॅल्शियमसोबत एकत्र येऊन क्रिस्टल्स तयार करू शकते, ज्यामुळे पुढे मूतखडा होण्याची भीती असते.

 

ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी जास्त ऑक्सलेट असलेले पदार्थ टाळणे महत्वाचे आहे.

आठवड्यातून किती प्रमाणात वांगी खाणे सुरक्षित आहे?

आठवड्यातून 2-3 वेळा वांगी खाणे सामान्य व्यक्तीसाठी सुरक्षित मानले जाते. परंतु जर तुमच्या कुटुंबात मूतखडा होण्याचा त्रास असेल तर, तुमच्या डॉक्टरांनी ते टाळण्याचा सल्ला दिला असेल तर डोस कमी करा.

तुम्हाला वांगी खायला आवडत असेल पण किडनी स्टोनचा धोका नको असेल, तर तुमच्या आहारात लिंबूपाणी समाविष्ट करा. जास्त पाणी प्या आणि मीठाचे सेवन कमी करा.

सामान्य प्रमाणात वांगी खाल्ल्याने कोणताही गंभीर धोका उद्भवत नाही. पण तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर, वांग्यासोबत पालक, चॉकलेट आणि सोया खाणे हितावह आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;