हुशार विद्यार्थ्याला तुम्ही संधी नाकारू शकत नाही, हायकोर्टाने सरकारला सुनावले

हुशार विद्यार्थ्याला तुम्ही संधी नाकारू शकत नाही, हायकोर्टाने सरकारला सुनावले

एमपीएससी परीक्षेत नापास केल्याने हायकोर्टात धाव घेतलेल्या उमेदवाराच्या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. हुशार विद्यार्थ्याला तुम्ही संधी नाकारू शकत नाही असे सुनावत हायकोर्टाने या प्रकरणी सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

मोरेश्वर सोनटक्के यांनी बीए, एलएलबी 2017 ते 2022  दरम्यान पूर्ण केले.  2024 साली एमपीएससीने सिव्हिल जज आणि ज्युडीशीअल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या पदासाठी जाहिरात काढली. या परीक्षेसाठी अर्ज भरत सोनटक्के यांनी 29 मार्च 2025 साली मेरिट मध्ये 29 वा क्रमांक मिळवला. एमपीएससीने जाहीर केलेल्या तात्पुरती निवड यादी 9 मे रोजी सादर केली मात्र त्यात याचिकाकर्त्यांचे नाव नव्हते याप्रकरणी चौकशी केली असता परीक्षेत पहिल्या प्रयत्नची अट पूर्ण न करण्यात आल्याने त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अॅड. सुमित काटे, अॅड. आदित्य खारकर आणि गार्गी वारुंजीकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;