बंगळुरुतील हरे कृष्ण मंदिर नेमकं कुणाचं? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
बंगळुरू येथील हरे कृष्ण मंदिराच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. हे मंदिर बंगळुरू इस्कॉन सोसायटीचे असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. बंगळुरूमधील हरे कृष्ण मंदिरावरील इस्कॉन सोसायटी, बेंगळुरूचा दावा न्यायालयाने कायम ठेवला आहे.
आध्यात्मिक आणि वैचारिक मुद्द्यांवर मतभेदांमुळे सुमारे 25 वर्षांपूर्वी इस्कॉन बंगळुरूने इस्कॉन जनरल बॉडीपासून वेगळे झाले. यानंतर 2001 मध्ये त्यांनी इस्कॉनचे बंगळुरूतील मंदिर आणि इतर मालमत्तांवर दावा केला. हा दावा दिवाणी न्यायालयाने 2009 मध्ये मान्य केला. परंतु 2011 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द करत मंदिर आणि इतर मालमत्ता इस्कॉन मुंबईकडे सोपवल्या.
इस्कॉन बंगळुरूने 23 मे 2011 च्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत 2 जून 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत हेर कृष्ण मंदिर इस्कॉन, बंगळुरूचे असल्याचे निकालात म्हटले. न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List