पुशअप्स मारून नारीशक्तीचा जल्लोष, 148 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन दिमाखात; एनडीएत घडला इतिहास

पुशअप्स मारून नारीशक्तीचा जल्लोष, 148 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन दिमाखात; एनडीएत घडला इतिहास

तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देश सेवेसाठी सज्ज असलेले तरुण-तरुणी.., सैन्यदलात दाखल होण्यासाठीचा चेहऱ्यावर झळकणारा आनंद.., शिस्तबद्ध संचलन.., लष्करी बँड पथकाच्या लयबद्द तालावर छात्रांच्या पावलांचा एकाच वेळी घुमणारा आवाज.., चेतक हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानांची दमदार सलामी अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 148 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार पडला. यंदाच्या संचलन सोहळ्यात एनडीएच्या इतिहासातील सोनेरी क्षण अनुभवायला मिळाला. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेली तीन वर्षे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या महिला कॅडेट्सच्या तुकडीने पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील अंतिम पग ओलांडत पुशअप्स मारून एकच जल्लोष केला.

एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर शुक्रवारी 148 व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. माजी लष्करप्रमुख, मिझोरामचे राज्यपाल जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी 148 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ प्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित, एनडीएचे कमांडंट व्हाइस अ‍ॅडमिरल गुरुचरण सिंग, डेप्युटी कमांडंट एअर व्हाईस मार्शल सरताज बेदी, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यावेळी उपस्थित होते. यंदाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात एक हजार 341 कॅडेट्स सहभागी झाले होते. यात पासिंग आउट तुकडीतील 336 तर 17 महिला कॅडेट्सचा समावेश होता.

या तरुणी नारीशक्तीचे प्रतीक – जनरल डॉ. विजय कुमार सिंग

एनडीएच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. पहिली महिला कॅडेट्सची तुकडी पासआउट झाली असून समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेतील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या तरुणी नारी शक्तीचे अनुकरणीय प्रतिक आहेत, असे मत माजी लष्करप्रमुख, मिझोरामचे राज्यपाल जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी व्यक्त केले. एनडीएत जे प्रशिक्षण दिले जाते ते जबाबदार व्यक्तिमत्त्वही घडवते, असे ते म्हणाले.

आमचे यश एनडीएत येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी – हरसिमरन कौर

एनडीएतील अनुभव खूपकाही शिकवणारा होता. मुलींच्या पहिल्या तुकडीची कॅडेट असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आमचे हे यश एनडीएत येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. पुढील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नौदलात दाखल होणार असल्याचे हरसिमरन कौर हिने सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Onion Price : कांदा पुन्हा रडवणार? किंमती गगनाला भिडणार, पावसाने केला मोठा खेळ Onion Price : कांदा पुन्हा रडवणार? किंमती गगनाला भिडणार, पावसाने केला मोठा खेळ
दक्षिण आणि मध्य भारतात अवकाळी आणि पूर्व मान्सून पावसाने धुवादार बॅटिंग केली. मे महिन्यातच पावसाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. त्यामुळे...
फक्त प्रेम…! गिल आणि पंड्याने शेअर केली खास पोस्ट, एलिमिनेटर लढतीवेळी वाद झाल्याची होती चर्चा
सर्वांना मलईदार खातीच हवी; कोकाटेंच्या विधानावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले
एका कंत्राटातून ज्यांना 3 हजार कोटींची लाच मिळते, त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? संजय राऊत यांचा सवाल
तुरुंगात असताना दहशतवादी जकीउर रहमान लखवी झाला बाप, ओवैसींनी पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला
Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कास
Covid -19 : देशात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ, आकडा 3000 पार, महाराष्ट्रासह केरळमध्ये अलर्ट