भेंडीचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, बहुसंख्य लोकांना माहीतही नाहीत

भेंडीचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, बहुसंख्य लोकांना माहीतही नाहीत

जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू नये. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयानुसार आपल्याला आपल्या आहारात भेंडीचे पाणी समाविष्ट करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर निरोगी तर राहतेच पण त्याचे अनेक फायदेही होतात.

भेंडीच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात. तसेच भेंडीच्या पाण्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. याशिवाय या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित होते. भेंडीचे पाणी पोषक तत्वांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो.

भेंडीचे पाणी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. हे पचनसंस्था मजबूत करते. हे पाणी प्यायल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

 

भेंडीच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. आपल्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. त्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेला ओलावा देतात आणि त्वचा मऊ ठेवतात.

भेंडीचे पाणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो. याशिवाय, ते आतड्यांतील कमकुवतपणा दूर करण्यास मदत करते.

भेंडीचे पाणी साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. टाइप- 2 मधुमेहात ते पिणे खूप प्रभावी मानले जाते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे अनेक आजारांपासून संरक्षण करतात.

भेंडीचे पाणी कसे तयार करावे?
भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर तिचे बारीक तुकडे करुन एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी पाणी गाळून घेऊन ते पाणी प्यावे. भेंडीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणापूर्वी प्यावे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.) 
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;