Vaishnavi Hagawane Case – फरार निलेश चव्हाणला अटक, नेपाळ बॉर्डरवरून पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Vaishnavi Hagawane Case – फरार निलेश चव्हाणला अटक, नेपाळ बॉर्डरवरून पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डवरून निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. निलेश गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणे आणि वेष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश चव्हाण हा शशांक हगवणे आणि करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ निलेशच्या ताब्यात होते. वैष्णवीचे बाळ परत देण्याच्या वेळी निलेश चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलचा धाक दाखवला होता. यानंतर 21 मे पासून निलेश चव्हाण फरार होता.

निलेश चव्हाण याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डवरून निलेशची गठडी वळली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;