Mumbai Police Transfer – मुंबई पोलीस दलात बदलीचे सत्र, एकाचवेळी 13 उपायुक्तांची ट्रान्सफर
On
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकाच वेळी पोलीस दलातील 13 उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता मुंबई पोलीस दलातील 13 उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले.
कुणाची कुठे बदली?
- कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ 3 मध्ये नियुक्ती
- दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ 10 मध्ये नियुक्ती
- महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ 12 मध्ये नियुक्ती
- समीर अस्लम शेख यांची परिमंडळ 6 मध्ये नियुक्ती
- राकेश ओला यांच्याकडे परिमंडळ 7 ची जबाबदारी
- नवनाथ ढवळे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकात नियुक्ती
- विजयकांत मंगेश सागर यांची बंदर परिमंडळमध्ये नियुक्ती
- प्रशांत अशोकसिंग परदेशी यांची वाहतूक विभाग (दक्षिण) मध्ये बदली
- निमित गोयल यांची विशेष कृती दल (आ.गु.वि) मध्ये नियुक्ती
- दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा 1 मध्ये नियुक्ती
- पुरषोत्तम नारायण कऱ्हाड यांची सायबर, गुन्हे पदी नियुक्ती
- सचिन बी. गुंजाळ यांची प्रतिबंधक (गुन्हे) शाखा पदी नियुक्ती
- राज तिलक रोशन यांची गुन्हे प्रकटीकरण पदी नियुक्ती
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List