सामना खेळूनच डब्ल्यूटीसीचा खरा सराव; हेझलवूडने केली आयपीएलची पाठराखण

सामना खेळूनच डब्ल्यूटीसीचा खरा सराव; हेझलवूडने केली आयपीएलची पाठराखण

दुखापतीतून सावरल्यानंतर लय पुन्हा प्राप्त करण्यासाठी मैदानावर उतरून खेळण्यापेक्षा चांगले काहीही नाही. सामन्यादरम्यान मैदानात उतरल्यानंतरच खऱ्या अर्थाने सराव होत असतो. दुखापतीतून मी सावरलो असून, आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून मिळणारा अनुभव हा मला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत नक्कीच कामी येईल. लय पुन्हा येण्यासाठी आयपीएलपेक्षा चांगले ठिकाण नाही, असा विश्वास बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने व्यक्त करत या स्पर्धेची पाठराखण केली.

खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतलेल्या जोश हेझलवूडच्या चेंडूने पंजाब विरूद्धच्या प्ले ऑफच्या लढतीत आग ओकली. दुखापतीतून परतल्या नंतरही हेझलवूडची भेदकता कमी झाली नव्हती. पंजाबविरुद्धच्या सामन्यात हेझलवूडने 3.1 षटकात 21 धावा देत तीन विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आरसीबीने पंजाबवर 8 गडी राखून विजय मिळवला. 2016 नंतर प्रथम आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला.

हेझलवूड म्हणाला, दुखापतीनंतर लय मिळवण्यासाठी मैदानावर खेळणे अत्यंत महत्वाचे असते. त्यापेक्षा चांगला सराव कोठेही होऊ शकत नाही. डब्ल्यूटीसी फायनलच्या तयारीसाठी मला गोलंदाजी करावी लागते. अर्थातच तुम्हाला कसोटीसाठी वेळोवेळी अधिक गोलंदाजी करावी लागते आणि अधिक सराव करावा लागतो. मी आज कसोटी सामन्यांमध्ये जवळजवळ त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो जशी मी गोलंदाजी करतो.

आयपीएल फायनल विराटचीच असेल – ऍबी डिव्हिलियर्स

गेल्या काही आठवड्यात मी माझ्या खांद्यावर खूप मेहनत घेतली आहे. गेल्या 10 दिवसांत चांगली गोलंदाजी केली आहे. कालच्या सामन्यात खेळपट्टी मदत करत होती. मला वेगवान यॉर्कर किंवा अतिरिक्त प्रयत्न करावे लागले नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranjeet Kasale : नेत्यांची पोलखोल करणं भोवले; बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक Ranjeet Kasale : नेत्यांची पोलखोल करणं भोवले; बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत...
बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? कोण आहे ती मुलगी? जाणून घ्या सत्य
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधून 20 वर्षीय तरुणाला अटक
रिंकू सिंहची विकेट पडली, थेट खासदार पटवली; लग्नाची तारीखही झाली निश्चित
NIA ची आठ राज्यांत 15 ठिकाणी धाड, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपातून काही जण ताब्यात
अहमदपूर तालुक्यात वळीवाच्या पावसाने 889 हेक्टरवरील रब्बी पिके; काढणीस आलेल्या ज्वारी, भुईमुगास फुटले कोंब
Onion Price : कांदा पुन्हा रडवणार? किंमती गगनाला भिडणार, पावसाने केला मोठा खेळ